रत्नागिरी (आरकेजी): शिवसेना सत्तेत किती आहे, याची सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादांना चांगलेच माहीत आहे. त्यांना सगळं माहीत असताना ही ते जर टीका करत असतील, तर ही टीका त्यांच्या अज्ञानातून असावी, असा खरपूस समाचार पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतला. मंत्री पाटील यांनी कोल्हापुरात शिवसेनेवर जहरी टीका केली होती. या टीकेला कदम यांनी चिपळूण-खेडमध्ये उत्तर दिले.
आमची बांधिलकी जनतेशी आहे. सत्तेत येण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी काय आश्वासन दिली होती, याचाच विसर भाजपाला पडला आहार. आश्वासनांची थोडी आठवण करून बघावी, मग शिवसेना आंदोलन का करते, याचं उत्तर आपोआप तुम्हाला मिळेल. आधी तुम्ही आपलं आत्मपरीक्षण करा मगच शिवसेनेवर टिका करा असा टोला रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.