रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील करंबवणे वरचीवाडी येथील रस्त्यांची दोन कामे मंजूर करून ती तातडीने पूर्ण करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते, मा.आमदार सदानंद चव्हाण यांची संपर्क कार्यालय चिपळूण येथे सदिच्छा भेट घेऊन खास आभार मानले. करंबवणे वरचीवाडी येथील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेऊन १) करंबवणे वरचीवाडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे (७ लक्ष) व २) करंबवणे वरचीवाडी मुख्यरस्ता (ग्रामा २४०) डांबरीकरण करणे (६ लक्ष) या कामांना मा. आमदार सदानंद चव्हाण यांनी जनसुविधा व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राधान्याने मंजुरी मिळवून घेतली व सदर रस्त्यांची कामेही तातडीने पूर्ण करून घेतली. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांची संपर्क कार्यालय येथे भेट घेऊन मा. आमदार सदानंद चव्हाण यांचे आभार मानले.
यावेळी करंबवणे वरचीवाडी मुंबई मंडळ सचिव विजय शिगवण तसेच किसन शिगवण, शांताराम माळी, हरिश्चंद्र शिगवण, देवेंद्र कदम, विजय माळी, सुरेश मोहित, प्रविण मोहित, मधुकर कदम, सुनिल मोहित, विजय बांद्रे आदी उपस्थित होते.