
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी )मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह येथे ईशान्य मुंबईतील पदाधिकारी व शिवसैनिकांच्या निर्धार शिबीराचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सांगता झाली. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सकाळी उद्घाटन केले. याप्रसंगी आदित्य ठाकरे यांनी मुंबई आणि मुंबईच्या समस्यांवर शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना खासदार संजय दिना पाटील, सुभाष देसाई, विक्रोळीचे आमदार सुनील राऊत, माजी आमदार रमेश कोरगावकर, युवा सेना सदस्य राजोल संजय पाटील व ईशान्य मुंबईतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसैनिकांच्या या निर्धार शिबीरात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. शिवसैनिकांना स्थानिक पातळीवर काम करण्यासाठी तसेच संघटना बळकटीसाठी प्रेरणा मिळेल असे उदगार या ठिकाणी आलेल्या शिवसैनिकांनी काढले.
















