गावातील ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, शाखाप्रमुख, यांच्या सहित अनेक शिवसैनिकांनी केला जाहीर प्रवेश
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील केळये गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शनिवारी उदय सामंत आगे बढो, किरण सामंत आगे बढो… हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
सरकार बदलल्यापासून गावाच्या विकास कामाला दडी बसली. उदय सामंत यांच्या माध्यमातून यापूर्वी गावाचा विकास झाला आणि आता गावाला विकासाच्या प्रगतीकडे नेण्यासाठीची भावना व्यक्त करत पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये गावातील माजी सरपंच, विद्यमान शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख आणि जुन्या-जाणत्या शिवसैनिकांचा समावेश आहे.
केळये गावातील लोकांनी एकत्र येत गावाच्या विकासाच्या दृष्टीने विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारत पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यावर विश्वास ठेवून हा प्रवेश केल्याचे सांगितले.
यावेळी केळये ग्रामपंचायतचे माजी सरपंच महेश धावडे, शाखा प्रमुख बाळकृष्ण रामाने, ग्रामपंचायत सदस्य दीप्ती सोलकर, मनस्वी कोलगे, महिला शाखा प्रमुख उज्जवला तेरेदेसाई, प्रणाली कोतवडेकर, विना लिंगायत, आसिम वाघधरे, रुहान माजगावकर,माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन मोहिते, गणपत मोहिते, माजी शाखा प्रमुख, वैभव लोढे,गौरव केळकर,पपू धुलप, रामचंद्र धुलप, गावकर सूर्या ढवळे,जनार्दन सुवरे, चंद्रशेखर धुलप,अलीम वाघधरे, यांच्या सहित अनेक शिवसैनिकांनी प्रवेश केला. या कार्यक्रम प्रसंगी मिरजोळे जिल्हा परिषद गटाचे विभाग संघटक फैयाज मुकादम, युवा सेना उपतालुका प्रमुख संदीप नाखरेकर, प्रशांत चवेकर, प्रवीण पवार, सायली नाखरेकर, श्रेया चवेकर, केळये सरपंच सौरभी पाचकुडे, युवासेना उपतालुका संघटक देवदत्त पेंडसे आदी उपस्थित होते.