मुंबई, 29 मे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शाखा क्रमांक २१५, युवा सेना आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना विरुद्धच्या लढाईचा एक भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ताडदेव येथील जनता केंद्र येथे नायर हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात कोरोनाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवरही तब्बल १२० बाटल्या रक्त गोळा करण्यात आले. ताडदेव विभागातील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी यावेळी आवर्जून रक्तदान करून माननीय उद्धव यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. नायर हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स आणि अन्य आरोग्य कर्मचार्यांनी पीपीई किट परिधान करून तसेच सोशल डिस्टंसिंग पाळत हे शिबीर यशस्वी केले.
यावेळी स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर आणि युवा सेनेचे मलबार हिल तालुका विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर आदी उपस्थित होते.