मुंबई : महापालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयांत मागील पाच वषार्त ६६ कमर्चाऱ्यांना क्षयरोगाची बाधा झाली असून त्यापैकी १७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे.
पालिकेच्या क्षयरोग रुग्णालयांतील कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना क्षयरोगाची बाधा होण्याचे प्रमाण वाढते आहे. मागील पाच वर्षात ६६ जणांना क्षयरोग झाला असून त्यातील १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहितीच्या अधिकारातूनही माहिती मिळवली आहे. क्षयरोग झालेल्या रुग्णांमध्ये ४९ कर्मचारी, ११ नर्सेस, दोन डॉक्टर तसेच १ लॅब तंत्रज्ञ, रेडीओग्राफर, फार्मासिस्ट यांचा समावेश असल्याचे त्यात नमूद आहे. मुंबईत क्षयरोगाचे प्रमाण वाढते असून या आजाराशी या रुग्णालयांतील कर्मचारी, डॉक्टरांनाही सामना करावा लागतो आहे. दरवर्षी किमान १४ डॉक्टरांना क्षयरोगाची बाधा होते, असे अधिकारात म्हटले आहे. या वृत्ताला संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे.
दरम्यान या रोगाचा संसर्ग होऊ नये यासाठी वापरण्यात येणारे पुरेसा मास्क, मास्कचा दर्जा किंवा स्टाफ स्वत:ची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.