क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर
मुंबई, दि. ०९ मे (क्री. प्र.):, दादरच्या शिवनेरी सेवा मंडळ आयोजित १४ वर्षाखालील मुले/मुली, १२ वर्षाखालील मुले/मुली, १० वर्षाखालील मुले/मुली यांच्यासाठी मुंबई जिल्हास्तरीय रोड रेस दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११/०८/२०२२ असेल. तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लुमाजी धुरी (९७६९५९१४१३) किंवा अक्षया गावडे (८६९२९४८०८७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवनेरी सेवा मंडळाने केले आहे.
शिवनेरी सेवा मंडळ सातत्याने कबड्डी, खो खो आदि स्पर्धा आयोजित करण्यात आघाडीवर असतात. तर यावेळी जिल्हास्तरीय रोड रेस स्पर्धा आयोजित केली आहे.