शहापूर(एस. गुडेकर ) : जनक्रांती संघटना ,ग्रामसाप,साप्ताहिक शिवमार्ग व लोक हिंद चॅनेलच्या वतीने रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत देशमुख वाडा,महाराष्ट्र बँकेच्या समोर,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शहापूर येथे शिवजयंती निमित्ताने “प्रिय शिवबास…”या नावाने काव्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे असून शिवकाव्याच्या माध्यमातून शिवविचारांचा गौरव करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय 25 कवी छत्रपती शिवराय यांच्यावर कविता सादर करणार आहेत. या संमेलनात उत्कृष्ट तीन कवींना रोख रक्कम,पुस्तके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे तर सर्व कवींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.परीक्षक म्हणून जेष्ठ नाटककार पंढरीनाथ पांढरे,जेष्ठ कवी प्रा.मधुकर हरणे,युवा कवी प्रा.नितीन पडवळ हे काम पाहणार आहेत.
शिवप्रेमी व काव्य रसिकांनी संमेलनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन प्रिय शिवबास संमेलन समितीचे अध्यक्ष परशुराम पितांबरे,शिवमार्ग चे संपादक महेश धानके आदींनी केले आहे.