
मुंबई : छ्त्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतलेले कष्ट, त्याग, युद्ध कौशल्य, मावळ्यांनी दिलेले बलिदान नवीन पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यातूनच युवकांच्या मनात प्रखर राष्ट्राभिमान निर्माण होतो, हा प्रमुख उद्देश ठेवूनच मालाडमधील कुरार गावात ३८७ वी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गड क्र. ४३ च्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले.
महाराजांचे कार्य फक्त इतिहासापुरतेच मर्यादित न राहता किल्ले, त्यांनी जिंकलेली युध्दे, त्यात वापरलेली शस्त्रे यांची माहिती गिरीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली. प्रदर्शनात शिवकालीन जुनी वापरात नसलेली व केवळ अभ्यासासाठी संग्रहित केलेली ऐतिहासिक २०० हून अधिक शस्त्रे, वस्तू, चित्रे, माहितीपर तक्ते व शिवकालीन नाणी शिवप्रेमींना पहायला मिळाली. राजमुद्रा कलासंस्थेतर्फे ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. ह्या संपुर्ण महोत्सवाला शेकडो प्रेक्षकांनी गर्दी केली होती. शिवरायांचा पराक्रम सांगणारा पोवाडा, गोंधळ नृत्य सादर करण्यात आले.
कुरारगावातील शिवजयंती महोत्सवाच्या कार्यक्रमात शालिनी ठाकरे, गजानन राणे, माजी पोलिस अधिकारी वेलिंग, कुरार पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, कुरार नववर्ष स्वागत समिती, नवनिर्माण संघर्ष ग्रुप, शिवशाही मित्र मंडळ, विभागातील आजी-माजी नगरसेवक, विविध प्रभागातील मनसे पदाधिकारी ह्यांची विशेष उपस्थिती लाभली. वनिता घाग, अरुण सुर्वे, केतन नाईक, सिताराम जाधव व राजेश केरकर ह्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. निकिता राजम, रसिका कदम, लक्ष्मी गव्हाणे, दिपाली माईन, गायत्री सावंत, श्रुती इचले, रेखा शेडगे, संतोष शेट्ये, अक्षय पनवेलकर, गौतम उमाशंकर, संतोष नाईक, संजय वरपे, रमित आर. के., दिपक खेंगले, सुशांत शिंदे, युसुफ खान, संजय मोंडवे, अजय टेंबवलकर, मनिष ठाकरे, सुरेश कट्टे, वसंत मांडवकर, सुचित कदम, नयन पुजारी, धीरज पुजारी, शाकीर शेख, अविनाश डोईजडे, सुनिल हुले, स्वप्नील मेजारी आदींनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी बहुमुल्य योगदान दिले. अशी माहिती उत्सव समिती चे अध्यक्ष मनीष धोपटकर यांनी दिली.