डोंबिवली : आचार्य अत्रे यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठान तर्फे 11 ऑगस्ट पासून तीन दिवसांच्या ‘हास्य विनोद-आनंद महात्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 13 ऑगस्ट रोजी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून शिवसेनेचे कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सदस्य दिपेश पुंडलिक म्हात्रे यांना कार्यक्षम कार्यकर्ता आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुणे येथील मॉडेल कॉलनी येथे कार्यक्रम होणार आहे. माजी न्या. बी. जी कोळसे पाटील यांच्या हस्ते 13 ऑगस्टला पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.