मुकेश श्रीकृष्ण धावडे
मुंबई प्रतिनिधी, दि.17. ; भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष या निमित्ताने शिवडी कोळीवाडा म्युनिसिपल शाळेच्या वतीने शनिवार, (ता.13) ऑगस्ट रोजी शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाळेचे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक पाराजी खेमनार, माध्यमिक शाळेच्या मुख्यद्यापक वीरकर, कन्नड शाळेचे शिक्षक तसेच शाळेतील इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.