मुंबई : सकल ओबीसी समाजाच्या वतीने 6 एप्रिलला मराठी नववर्षाच्या दिनी शिवाजी पार्कचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा करण्यात यावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्क असा फलक लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री, मुंबई पालिका आयुक्त, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आदींना याबाबत पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती सकल ओबीसी समाजाच्या संस्थापकीय अध्यक्ष कांचन नाईक यांनी दिली. निसार अली, सुमन कडलक, शिला पटेल, मनोज परमार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.