डोंबिवली, (प्रशांत जोशी) : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही १७ वी आंतरशालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धा रविवार २९ लै रोजी सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सुमारे ६ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या मॅरेथॉन स्पर्धेबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली इनामदार म्हणाल्या, ८ ते १८ वयोगटातील मुला मुलींच्या आठ गटांचा तसेच मतीमंद, गतीमंद व कर्णबधिर विद्यार्थी या मध्ये सहभागी होणार आहेत. कल्याण तालुक्यातील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला. २९ तारखेला सकाळी आठ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार असून पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर होणार असल्याचे त्यांनी पुढे सांगीतले.