मुंबई । चिपळूण तालुक्यातील वारेली गावातील मुंबईस्थित नवतरुण उत्कर्ष मंडळ या सामाजिक संस्थेने शिवजयंतीसाठीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत म्हणून दिली. 11 हजार इतकी रक्कम देणगी रुपाने देण्यात आली आहे.
कोरोनासारख्या महाभयंकर रोगाविरोधात डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस आणि पालिका कर्मचारी लढत आहेत. त्यांच्या या लढ्यात आपलाही सहभाग असावा, या उद्देशाने निधी देण्यात आला आहे. दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोंनाच्या संकटामुळे शिवजयंती उत्सव सोहळा रद्द करून त्यासाठी खर्च होणारी रक्कम सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याचे मुंबई मंडळाने सांगितले.
देशावर जी परिस्थिती उद्भवली आहे. त्यावर मात करण्यासाठी एकीने लढण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हायलाच हवे. याच दृष्टिकोनातून वारेली गावातील मुंबई स्थित नवतरुण उत्कर्ष मंडळाने जी भूमिका निभावली ती योग्य आहे. प्रत्येक मंडाळाने जर अशी भूमिका घेतली तर ते देशासाठी नक्कीच हिताचे ठरेल . कोरोना सारख्या महामारीचे सावट देशात पसरलेले असताना या महामारीविरोधात डॉक्टर पोलीस पालिका सर्व यंत्रणा अहोरात्र आपल्यासाठी झटत आहेत. अशा योद्ध्यांसाठी एक हात मदतीचा पुढे करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्यादृष्टीकोनातून आमच्या मंडाळाने निधी जमा केला त्याचप्रमाणे काही गरजू कुटुंबाना देखील मदत करण्यात आली असल्याचे मंडळाचे सुभाष कदम यांनी सांगितले.