रत्नागिरी दि.18:- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २०२२ च्या परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक 01 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दिनांक ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी. ३१ जानेवारी २०२२ नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी.
आवेदनपत्र भरणेसाठी मुदतवाढ दिल्याने 20 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नसल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. सबब परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे














