रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेचा अमृत महोत्सव समारंभ दि. 24 व 25 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सोहळयाला उद्योग मंत्री उदय सामंत, माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, चितळे उद्योगसमुह पुणेचे संजय चितळे तर समारोप समारंभाला केंद्रीय बंदरे व पर्यटन मंत्री तथा सोसायटीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असल्याचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रा.भा.शिर्के प्रशालेच्या सौ. विजयालक्ष्मी मलुष्टे रंजनमंदिर मध्ये हा सोहळा साजरा केला जाणार आहे. उद्घाटन समारंभ दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. होणार आहे. या महोत्सवाचा समारोप दि. 25 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजता होणार आहे. र. ए. सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेला 75 वर्षे पुर्ण होऊन शाळेने अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे.सन 1948 साली संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव जोशी यांनी दूरदृष्टीने ट्युटोरियल स्कूल चालविण्यासाठी आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी कै. रामदास भाऊसाहेब शिर्के यांनी उदारहस्ते दिलेल्या देणगीतून व्युटोरियल स्कूलचे नामकरण रा. भा. शिर्के प्रशाला असे करण्यात आले. आज प्रशालेने सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत जनमानसात वेगळा ठसा उमटवला आहे. याचे सर्व श्रेय संस्थेचे आजवरचे सर्व संस्थापक, पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, जागरूक पालक वर्ग आणि प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी या सर्वांना आहे.
शालेय उपक्रमांबरोबरच शालाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये (शिष्यवृत्ती, एन.एम.एम.एस., गणित प्रज्ञाशोध, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा) सातत्याने मिळणाऱया घवघवीत यशाची तसेच दहावी बोर्डाच्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. क्रीडा क्षेत्रात शाळेचा कायम दबदबा असतो. शाळेचे प्रशस्त क्रीडांगण अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत आहे. दिल्ली येथे होणाया आर.डी. परेडसाठी सलग दोन वर्षे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य प्रशालेला लाभले आहे. तसेच शासनामार्पत प्रशालेला अटल टिंकरींग लॅब मंजूर झाली आहे. या लॅबमधील विविध वस्तूंचा उपयोग करून रोबोट बनविणे, थ्रीडी प्रिंटर चालवणे, लॅपटॉपच्या आधारे प्रोग्राम बनविणे या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत आहे.
कै. ल.ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी ही शाळा जून 1995 मध्ये सुरू झाली. संस्थेचे तत्कालीन कार्याध्यक्ष कै. अरुअप्पा जोशी यांनी शिक्षण क्षेत्रातील भविष्याचा वेध घेऊन हे विद्यामंदिर सुरू केले. आज या शाळेने आपल्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे. गुरुकुल प्रकल्प हे प्रशालेचे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पाऊल. पंचकोशाधारित सर्वांगीण शिक्षण देणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे.
दोन दिवस होणाऱया शाळेच्या अमृत महोत्सव समारंभाला उपस्थित राहाण्याचे आवाहन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष तथा शिर्के प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अŸड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सह. कार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शिर्के प्रशाला कनिष्ट महाविदयालय शालेय समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, मुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.

अमृत महोत्सवानिमित्त कार्यकम
24 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 ते 10.00 या वेळेत उपस्थितांची नोंदणी व चहापान. सकाळी 10 वाजता मुख्य उदघाटन समारंभ होईल. भोजनानंतर दुपारी 2. 30 ते 4. 00 माजी विदयार्थी यांचा गाण्याचा कार्यक्रम, सायं. 4 ते 5. 30 शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम, सायं 5.30 ते 7. 30 वा. माजी विदयार्थ्याचे सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न होतील. सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 10 चहापान, सकाळी 10 ते 11 माजी शिक्षकांचा सत्कार, सकाळी 11 ते 12 शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम, दुपारी 12 ते 1.30 माजी विदयार्थ्याचा सांस्कृतीक कार्यक्रम, जेवणानंतर दुपारी 3 ते 4 शिक्षकांचे सांस्कृतीक कार्यक्रम. सायं. 4 वाजता मुख्य समारोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.