रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : शिरळ विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील कोंढे, पाचाड व वैजी गावातील यशस्वी आयोजनानंतर श्री राधाकृष्ण मंदिर, मालघर येथे शेतकरी संपर्क अभियानाला उदंड प्रतिसाद लाभला.
मालघर ग्रामपंचायत व श्री राधाकृष्ण सेवा मंडळ यांच्या वतीने चेअरमन सुनिल टेरवकर व संचालक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सोसायटीच्या वतीने सर्व मान्यवर, आजी माजी पदाधिकारी व सर्व वाडी प्रमुखांचा सन्मान करण्यात आला. शिरळ सोसायटीच्या धर्मादाय निधीतून रक्कम रु पाच हजाराचा धनादेश चेअरमन टेरवकर यांच्या शुभहस्ते श्री राधाकृष्ण सेवा मंडळाचे अध्यक्ष गणपतदादा तटकरे यांजकडे देणगी म्हणून सुपूर्द करण्यात आला. चेअरमन यांनी भाषणात बोलताना, विविध कार्यकारी सोसायटीचे महत्त्व, व्याजदर, नवीन सभासद निकष व ९७ वी घटनादुरुस्ती आदी विषयांवर विस्तृत भाष्य केले. संचालक मंडळ व शेतकरी बांधव यांनी संवाद साधत विविध योजना व कर्ज प्रस्ताव यांवर चर्चा करण्यात आली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेश वाजे, महाराष्ट्र यादव चारीटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष मनोहर वाजे, शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव पवार, मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी रामदादा तटकरे व उदय महाडिक यांनी सोसायटीविषयी आपले विचार व सूचना मांडल्या.
शेतकरी अभियानाला उपसरपंच सुनिल वाजे, ग्रामपंचायत सदस्या सारिका किलजे, माजी उपसरपंच सुनिल तांबडे व विनया वाजे, तंटामुक्तसमिती अध्यक्ष विलास मोरे, सोसायटी माजी संचालक बळीराम जाधव, माजी संचालिका विजया मोरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष विनोद महाडिक, माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाराम महाडिक व बाळ वाजे, माजी ग्रामपंचायत सदस्या संगीता महाडिक, वैशाली घोले व सुप्रिया चिले, सोहम मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश वाजे, दीपक महाडिक, प्रभाकर तटकरे, श्रीकृष्ण किलजे, शिवराम तटकरे, चंद्रकांत दुदुस्कर, महेश टेरवकर, अशोक किलजे, पांडुरंग लटके, राजश्री रहाटे, संतोष लटके व शंभर शेतकरी बांधव उपस्थित होते. अभियान यशस्वी करण्यासाठी व्हाईस चेअरमन दिलिप देसाई, ज्येष्ठ संचालक तुकाराम बामणे, अनंत ठसाळे, अनिलशेठ चिले, भाई करंजकर, दिलिप कुळे, रवींद्र मोहिते, विनायक भुवड, संचालिका विजया मोरे व श्रद्धा घोले, तज्ञ संचालक रमेश ठसाळे, आत्माराम खेतले, सचिव संजय खेतले व लिपिक प्रफुल्ल साबळे यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचलन विजय वाजे व आभार प्रदर्शन राजेंद्र पवार यांनी केले.