रत्नागिरी, (आरकेजी) : पोहण्यासाठी गेलेला पोलीस शिपाई बुडाल्याची घटना आज राजापूर तालुक्यात घडली. तालुक्यातील माडबन येथील
चिरेखाणीत तीन पोलीस शिपाई पोहायला गेले होते. पोहत असताना एक जण बुडाला. प्रशांत प्रकाश विचारे असे त्याचे नाव आहे.
चिरेखाणीत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशांत हा रत्नागिरी पोलीसमध्ये कामाला होता.