रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी तालुका अशासकीय माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा रामचंद्र केळकर यांची बिनविरोध निवड झाली. फाटक हायस्कूलमध्ये संघटनेची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवी कार्यकारिणी खालील प्रमाणे
अध्यक्ष- रामचंद्र केळकर (गोडबोले हायस्कूल, केळ्ये), उपाध्यक्ष श्रद्धा नागवेकर (अ. के. देसाई हायस्कूल) आणि शंकर पालवकर (कुरतडे), सचिव संतोष शिंदे (कुर्धे हायस्कूल), सहसचिव संतोष मळेकर (जांभेकर विद्यालय), कोषाध्यक्ष हरिभाऊ ताडे (पटवर्धन हायस्कूल), सदस्य- शंकर शेलार (नाणीज), दिनेश महाकाळ (पाली), स्मिता चव्हाण (शिर्के हायस्कूल), चंद्रकांत कडू (मालगुंड), मुजीब कोतवडेकर (साखरतर), राधाकृष्ण कीर (यशवंतराव माने विद्यालय, निवळी), नदीम बांगी (ए. डी. नाईक हायस्कूल), वैदेही मांडवकर (मुळ्ये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी), राजेंद्र कदम (मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे), सल्लागार- शेखर लेले (फाटक हायस्कूल), गौतम सावंत (कोतवडे), प्रियांका धर्णे (शिर्के हायस्कूल), संचालक- विजय चव्हाण (जागुष्टे हायस्कूल, कुवारबाव).