नागपूर : गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ हमीद यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस एक लक्ष रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपूर्द केला.
रामगिरी येथे अल्ताफ हमीद यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाळे, आमदार संजय पुराम, विरेंद्र अंजनकर, हेमंत पटले, प्रमोद संगीडकर आदी उपस्थित होते.