
मुंबई : राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी दिली. अर्थमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करतील, असे वाटत होते. परंतु, त्यांनी दिशाहीन अर्थसंकल्प मांडला, असेही ते म्हणाले. ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.
किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते, त्या न केल्याने तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.