रत्नागिरी, (आरकेजी) : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या दुसर्याच दिवशी कोकणातल्या बाजारांमध्ये भाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भाज्यांचे दर तिप्पट झाले असून अनेक दुकानांतून भाज्याही दिसेनाश्या झाल्या आहेत. दुधाचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. शेतकर्यांनी सांप मागे न घेतल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
कोकणातील बहुतेक बाजारपेठेत पश्चिम महाराष्ट्रातून दररोज भाजी येते.शेतकर्यांच्या तीव्र संपामुळे आज रत्नागिरीच्या मार्केटला भाज्यांचे ट्रक आलेच नाहीत. त्यामुळे व्यापार्यांनी भाज्यांचे दर वाढवले.
दोन दिवसांपूर्वी १५ ते ३० रुपये किलो दराने भाज्या मिळत होत्या. त्याच भाज्या आज ५० ते ६० रुपये किलोपर्यंत विकल्या जात होत्या. ५ ते १० रुपयांना मिळणारी कोथिंबीरीची जुडी ३० रुपयांपर्यंत पोहचली आहे.