मुंबई : राज्यसरकारने शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमी भाव द्यावा, या विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शेतकरी संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली. काही भागात त्याला हिंसक वळण मिळाले. संतप्त शेतकर्यांनी दुधाच्या गाड्या रोखल्या. तसेच दूध रस्त्यावर ओतून सरकारचा तीव्र निषेध केला. अनेक ठिकानी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जाळपोळही करण्यात आली. अहमदनगर, नाशीक आदी जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता अधिक होती.
आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाचीही झाली. शेतकरी संप चिघळल्याचा फायदा व्यापार्यांनी घेत भाज्यांचे भाव वाढविले. आजचा संप मोडून काढण्यास राज्य सरकारला यश मिळाले नाही. शेतकर्यांनी एकजुटीने संप यशस्वी केला.