
तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत तसेच महागाई, बेरोजगारी विरोधात पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेसने राज्यभर उपोषण करून मोदी सरकारचा धिक्कार केला. मुंबईत मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आ. अमर राजूरकर, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा. खा. एकनाथ गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, असंघटीत काँग्रेसचे अध्यक्ष बद्रुजमा, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, सुशीबेन शहा, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, प्रदेश सचिव राजाराम देशमुख, अल् नासेर झकेरिया, जिशान अहमद, देवानंद पवार, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, देशभरातील शेतकरी काळ्या कृषी कायद्यांविरोधात एकवटला असताना मोदी सरकारने त्यांची दखल घेतली नाही. हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर अमाप कर वाढवून लूट चालवली आहे. डॉ. मनमोहन सिंह सरकार असताना पेट्रोलवर १ रुपये रस्ते विकास कर होता तो मोदींनी तो १८ रुपये केला आणि त्यावर शेतकऱ्यांच्या नावाने लिटरमागे ४ रुपये सेस असे तब्बल २२ रुपये प्रति लिटरमागे लूट केली जात आहे. शेतक-यांच्या नावावर वसुल केल्या जात असलेल्या ४ रुपयांतून मोदी सरकार दरवर्षी ७६ हजार कोटी रुपये कमावते आणि जुलमी कायदे आणून शेतक-यांना देशोधडीलाही लावत आहे. केंद्रातील सरकार हे ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे असे पटोले म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळी म्हणाले की, ‘ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजप सरकार सत्तेच्या धुंदीत एवढे मस्त झालेत, मग्न झालेत की मागील ४ महिन्यांपासून देशाचे अन्नदाता शेतकरी सिंधू बॉर्डरवर आंदोलन करत आहेत, ३०० पेक्षा जास्त शेतकरी या आंदोलनात शहीद झालेत. त्याची दखल घ्यायला सुद्धा त्यांच्या जवळ वेळ नाही. हे अतिशय निर्दयी सरकार आहे. देशाचे व देशातील जनतेचे यांना काहीही पडलेलं नाही. हे सरकार, हम दो हमारे दो या नीती ने चाललेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना अदानी आणि अंबानी यांच्या दावणीला बांधण्याचे पाप हे मोदी सरकार करत आहे. हा आमचा नुसता आरोप नाही तर हि वस्तुस्थिती आहे. कारण हे कायदे येण्यापूर्वीच हरयाणामध्ये १०० एकर जमिनीवर अदानी च्या गोडाऊनचे काम सुरु होते. एका सुज्ञ नागरिकाने गुप्तपणे काढलेल्या व्हिडीओ काढून सोशल मीडिया वर टाकल्यामुळे ही गोष्ट सर्वांच्या लक्षात आली. अशा प्रकारे हे अहंकारी सरकार, गरिबांना संपवणारे, शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या मुळावर उठलेले सरकार आहे. कामगारांचे ४४ कायदे सुद्धा याच काळामध्ये अशाच पद्धतीने मोदी सरकारने रद्दबादल केले. जे कायदे मंजूर करण्यासाठी या देशात कामगारांनी आपले रक्त सांडले, ते कायदे या सरकारने रद्द करून ४ कायदे (कोड) आणलेले आहेत. जे कामगारांना पूर्णपणे उध्वस्थ करणारे आहेत, त्यांच्या विरोधात सुद्धा आमचे हे आंदोलन आहे. मोदी सरकारने शेतकरी व कामगार कायदे बदलून त्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून आपल्या हक्काच्या कायद्यासाठी कामगारांनी बलिदान दिले. ते कायदे बदलून मोदी सरकारने कामगार चळवळच मोडीत काढण्याचे पाप केले आहे. पेट्रोल, डिझेल हे पाकिस्तान, नेपाळमध्ये भारतापेक्षा स्वस्त आहे पण भारतात मात्र लुटमारी सुरू आहे.
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘मोदी सरकारने कृषी कायद्यांना स्थगिती दिली आहे आता त्यांनी शेतक-यांशी चर्चा करून नवीन कृषी कायदे केले पाहिजेत. हे नवीन कृषी कायदे संसदेच्या स्थायी समिती समोर ठेवावेत. जोपर्यंत हे नवीन कायदे होत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. महागाई प्रचंड वाढली आहे. जगभरात भारतातच पेट्रोल डिझेल वर भरमसाठ कर लावलेले आहेत. ते सुद्धा कमी केले पाहीजेत अशी आमची मागणी आहे