मुंबई, (निसार अली) : गोरेगाव येथे पालिका प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेल्या आरे कॉलनीतील सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन मनपा सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांच्या हस्ते 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात शौचालय निमिर्तीकरीता श्रमदान करणा-या नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
आरे कॉलनीतील युनीट क्रमांक 32 मध्ये शौचालयाची कमतरता होती. स्थानिक नागरिकांनी लोकशाहीर सिताराम बाबू सोनवणे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पालिकेच्या पी दक्षिण विभागीय कार्यालयात केलेल्या मागणीचा विचार करुन शौचालय बांधण्यात आले. स्थानीक नागरिकांनी याकरिता श्रमदान केले होते.