सर्व क्रिकेटप्रेमींना विरेंदर सेहवाग, रविचंद्रन अश्विन, गौतम गंभीर, शिखर धवन, अजित आगरकर व आकाश चोप्रा अशा क्रिकेट आयकॉन्ससोबत संलग्न होण्याची आणि अभूतपूर्व सोशल क्रिकेट अनुभव प्राप्त करण्याची संधी मिळणार
मुंबई : क्रिकेटचे अधिपत्य असलेल्या भारतासारख्या क्रीडाप्रेमी देशामध्ये शेअरचॅटने आगामी क्रिकेट टूर्नामेण्ट्ससाठी आठ भारतीय भाषांमध्ये धावफलक व बॉल-टू-बॉल समालोचन देण्यासाठी नवीन वैशिष्ट्य लाँच केले आहे.
आपल्या ऑडिओ चॅटरूम वैशिष्ट्याचा लाभ घेत हे व्यासपीठ सर्वांगीण सोशल क्रिकेट अनुभव देण्यासाठी विरेंदर सेहवाग, रविचंद्रन अश्विन, गौतम गंभीर, शिखर धवन, अजित आगरकर व आकाश चोप्रा यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत चॅटरूम सत्रांचे आयोजन देखील करत आहे. १८० दशलक्ष प्रबळ शेयरचॅट समुदायाला त्यांच्या आवडत्या खेळाडूंसोबत सर्वात लोकप्रिय व सुरू असलेल्या क्रिकेट इव्हेण्ट्समधील सामने, कामगिरी व इतर प्रमुख क्षणांबाबत चर्चा करण्यासोबत त्यामध्ये संलग्न होण्याची संधी मिळेल.
शेयरचॅट हे भारताचे सर्वात मोठे भारतीय भाषिक सोशल मीडिया व्यासपीठ असल्यामुळे ही वैशिष्ट्ये आठ विभिन्न भाषांमध्ये उपलब्ध असतील (तमिळ, तेलुगु, कन्नड, हिंदी, बांग्ला, मराठी, पंजाबी व मल्याळम). नवीन वैशिष्ट्य भारतभरातील क्रीडाप्रेमींना अभूतपूर्व अनुभव देईल आणि रिअल-टाइममध्ये मुक्तपणे त्यांचे विचार सांगण्यास व संवाद साधण्यास सक्षम करेल.
यासोबतच क्रिकेटप्रेमी चालू सामन्यांदरम्यान त्यांच्या टीम चॅटरूम्सच्या माध्यमातून इतर क्रिकेटप्रेमींशी संलग्न होतील, त्यांची आवड शेअर करतील, त्यांच्या आवडत्या संघांना पाठिंबा देतील आणि क्रिकेटच्या धमाल रोमांचचा आनंद घेतील.
शेयरचॅटच्या कन्टेन्ट स्ट्रॅटेजी व ऑपरेशन्सचे वरिष्ठ संचालक शशांक शेखर म्हणाले, ”भारतीयांनी नेहमीच क्रिकेटला अधिक प्राधान्य दिले आहे आणि हा विविध प्रांत, भाषा व संस्कृती असलेल्या अब्जोहून अधिक भारतीय क्रीडाप्रेमींना एकत्र आणणारा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. शेयरचॅटमध्ये आमचा नेहमीच नाविन्यपूर्ण सहयोगांसह, तसेच सोशल अनुभव देत युजर्सचे मनोरंजन करण्याचा मनसुबा आहे. तसेच शेयरचॅट ऑडिओ चॅटरूम अधिकाधिक लोकप्रिय होत आहे आणि आमचे युजर व क्रिएटर समुदायासाठी सर्वात मोठे प्रतिबद्धता वैशिष्ट्य म्हणून उदयास येत आहे. आम्ही आमच्या समुदायासोबत संलग्न होत मॅच अपडेट्स व अॅनालिसिसबाबत माहिती सांगण्यासाठी क्रिकेट तज्ञांना देखील सादर करणार आहोत. आम्ही क्रीडा इव्हेण्ट्ससाठी पूर्णत: नवीन सोशल अनुभव निर्माण करण्याप्रती खूपच उत्सुक आहोत.”
शेयरचॅट ऑडिओ चॅटरूम व्यासपीठाचे प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे. मासिक स्ट्रीम केले जाणारे २ बिलियन मिनिटांहून अधिक कन्टेन्ट, १६ दशलक्षहून अधिक एमएयू असलेल्या या व्यासपीठाने भारताचे सर्वात मोठे लाइव्ह ऑडिओ उत्पादन बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. अलिकडील आठवड्यांमध्ये अनेक चॅटरूम्स सादर करण्यात आल्या आहेत, ज्यांना अधिकाधिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये अक्षय कुमार, भुवन बाम आणि प्रसिद्ध कवी व गायक यांनी सहभाग घेतला होता. याव्यतिरिक्त शेयरचॅट त्यांच्या चॅटरूम सत्रांना नव्या उंचीवर घेऊन जात युजर्समध्ये प्रतिबद्धतेचे सर्वात मोठे स्रोत बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
शेयरचॅट बाबत
शेयरचॅट हे आघाडीचे भारतीय सोशल मीडिया व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचे १८० दशलक्षहून अधिक मासिक सक्रिय युजर्स आहेत. हे व्यासपीठ युजर्सना त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये त्यांची मते शेअर करण्याची, त्यांचे लाइव्ह्ज रेकॉर्ड करण्याची आणि नवीन मित्र बनवण्याची सुविधा देते. भारताच्या इंटरनेट क्रांतीमध्ये अग्रस्थानी असलेले शेयरचॅट भावी बिलियन युजर्स इंटरनेटवर करणा-या संवादामध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. आयओएस व अँड्रॉईडवर उपलब्ध असलेले शेयरचॅट डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (click here).
अधिक माहितीसाठी कृपया press@sharechat.co येथे ईमेल करा