मुंबई, १७ मे २०२१: आज बाजारात गुंतवणुकदारांचा मजबूत आत्मविश्वास दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोघांनीही १.५% पेक्षा जास्त नफा कमावला. सेन्सेक्सने ८४८.१८ अंकांचा नफा कमावला व तो ४९,५८०.७३ अंकांजवळ पोहोचला. किंवा मागील क्लोजिंगपेक्षा १.७४% ची उसळी सेन्सेक्समध्ये दिसली. तर ५०- स्टॉक बारोमीटर निफ्टीनेदेखील १.६७% ची वृद्धी घेत दिवसातील व्यापारात २४५.३५ अंकांची उसळी घेतली. निफ्टी १५,००० पातळीच्या अगदी जवळ म्हणजेच १४,९२३.१५ अंकांवर स्थिरावला. वित्तीय आणि मेटल निर्देशांकांनी वाहन आणि ऊर्जा सेक्टर्ससह बाजाराचे वहन केले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
बाजाराला पुढे नेणारे काही उच्चांकी स्टॉक्स पुढीलप्रमाणे:
हेस्टर बायोसायन्सेस: हेस्टर बायोसायन्स हे सुरुवातीच्या व्यापारापासूनच उच्चांकी स्थितीत होते. कारण या फार्मास्युटिकल फर्मने ती भारत बायटेकसोबत चर्चेत असल्याचे म्हटले. भारत बायोटेकची कोव्हिड-१९ लस ‘कोव्हॅक्सीन’ तयार करण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करण्याकडे कंपनीचे लक्ष आहे. क्लोझिंग बेलच्या वेळी बेस्टर बायोसायन्सेसचे शेअर्स २०% अप्पर सर्किटला टेकले. स्टॉक २,९६८.८५ रुपयांवर स्थिरावला.
लार्सन अँड टुब्रो: इंजिनिअरिंगमधील या प्रमुख स्टॉकने एकत्रित नफा १४ मे रोजी ३,२९२.८१ कोटी रुपये नोंदवल्यानंतरही तो १.९१% नी घसरला. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीने ३% एकूण नफा वाढवला. चालू कामकाजातील त्याचा नफा ३,८२०.१६ कोटी रुपये होता याद्वारे वार्षिक वृद्धी ११.४ टक्के झाली. वाढीव कर मूल्य, जे ११६% जास्त २,०८६.७१ कोटी रुपये झाले तसेच महसूलात अपेक्षित वृद्धी कमी झाल्याने हा ट्रेंड दिसून आला. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स सोमवारी १,३८८.४० वर स्थिरावले.
फेडरल बँक: अस्थिर व्यापारानुसार, फेडरल बँकेचा शेअर मागील क्लोजिंगपेक्षा २.३२ टक्क्यांनी वाढून ८१.५० रुपयांवर स्थिरावला. बँकेने मागील वर्षातील या काळाच्या तुलनेत ३०१.२ कोटी निव्वळ नफा कमावला होता. या वर्षी चौथ्या तिमाहीत तो ४७७.८ कोटी रुपये झाला. त्यामुळे वार्षिक स्तरावर ५८.६% उसळी नोंदवली गेली. बँकेचा एनआयआयदेखील १,४२०.४ कोटी रुपयांनी वाढला. मागील वर्षी याच काळात तो १,२१६ कोटी रुपयांच्या तुलनेत १६.८ टक्क्यांनी जास्त नोंदला गेला.
भारती एअरटेल: दूरसंचारमधील दिग्गज कंपनी असलेल्या भारती एअरटेलने आर्थिक वर्ष २०२१च्या चौथ्या तिमाहीमधील एकत्रित निव्वळ नफा ७५९ कोटी रुपये नोंदवला. तरीही सोमवारी कंपनीच्या शेअरचे मूल्य २ टक्क्यांनी घसरले. मागील वर्षी याच काळात भारती एअरटेलने ५,२३७ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. मागील वर्षी याच काळात या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचा महसूल २३,०१८ कोटी रुपयांवरून १२ टक्क्यांनी वाढून सध्या तो २५,७४७ कोटी रुपयांवर पोहोचला. भारती एअरटेलने बंद होताना ५४७.८० रुपयांचे मूल्य गाठले.
सिपला: सोमवारी सिपलाचे शेअर्स २.२८% नी घसरले. औषधनिर्माणातील प्रमुख असलेल्या या कंपनीने १४ मे रोजी एकूण नफ्यात ७२.२% ची वृद्धी नोंदवली. ऑपरेटिंग परफॉर्मन्सचे समर्थन असल्याने तो ४११.५ कोटी रुपये झाला. विश्लेषकांच्या अपेक्षेच्या तुलनेत थोडी कमी कामगिरी असल्याने या स्टॉकचा उतरता ट्रेंड दिसून आला असावा. नॉर्त अमेरिकन बिझनेस ऑफ फर्मने वार्षिक स्तरावर १७% वृद्धी दर्शवली. तर भारतातील ही वृद्धी ४% च्या जवळपास ठरली. सिपलाचा एकूण महसूल ४६०६.४ कोटी रुपयांपर्यंत वाढला. सिपलाने मार्केट बंद होताना ८८३.४५ रुपयांचे मूल्य गाठले.
शिल्पा मेडिकेअर: शिल्पा मेडिकेअरने जवळपास १२% (११.९१%) चा नफा एनएसईवर कमावला. कारण कंपनीने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजशी भागीदारी केली. कोव्हिड-१९चा उद्रेकाविरुद्धच्या लढ्यात स्पुटनिक व्ही लस तयार करण्याच्या तीन वर्षाच्या करारावर या दोघांनी स्वाक्षरी केली. शिल्पा मेडिकेअरचे शेअर्स आज एनएसईवर ५०९.८० रुपयांवर पोहोचले.