मुंबई, 28 मे : आज बँकिंग क्षेत्रातील शेअरर्सच्या वृद्धीमुळे बेंचमार्क निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक पुढे सरकला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ९९५.९२ अंकांची बढत घेत म्हणजेच ३.२५ टक्के वृद्धीसह ३१,६०५.२२ अंकांवर बंद झाला. ही मे महिन्यातील सर्वात मोठी वृद्धी असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. निफ्टीदेखील २८५.९० अंकांनी पुढे जात किंवा ३.७१ टक्क्यांनी बढत घेत ९३१४.९५ अंकांवर स्थिरावला. निफ्टी ५० इंडेक्सने ९३०० झोनवर पुन्हा हक्क सांगितला. बाजार बंद होताना ९३९ शेअर्सनी आज मूल्यात घसरण घेतली तर १३६३ शेअर्सनी चढाई केली. तर १६२ शेअर्स जैसे थे स्थितीत राहिले.
विविध सेक्टर्समध्ये फार्मा इंडेक्सने थोडी घसरण घेतली. तर निफ्टी बँकेने चांगलीच उसळी घेतली. त्यानंतर आयटी, मेटल आणि एनर्जीने वृद्धी केली. टॉप सेन्सेक्स गेनर्समध्ये अॅक्सिस बँक (७%) आणि आयसीआयसीआय बँक (५%) यांचा सहभाग आहे. त्याखालोखाल कोटक महिंद्रा बँक (५.५८%) आणि बजाज फायनान्स (५.८४%) यांचा क्रमांक लागला.
तिमाहीतील कमाई:
डाबर इंडियाचा निव्वळ नफा २४ टक्क्यांनी कमी झाला. तो ३७० कोटी रुपयांच्या तुलनेत २८१.२ कोटी रुपयांवर आला. तर कंपनीचा महसूल २१२८.२ कोटी रुपयांच्या तुलनेत १२.४ टक्के कमी म्हणजेच १८६५.४ कोटी रुपये झाला. सन फार्माने मार्च २०२० मध्ये संपलेल्या तिमाहीत ३९९ कोटी रुपयांचा एकत्रित नफा नोंदवला. या आर्थिक वर्षात तो ६३५ कोटी एवढा असेल. मागील वित्तीय वर्षात याच काळात सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचा महसूल ७१६४.९२ कोटी रुपयांच्या तुलनेत ८१८४.९ कोटी रुपये एवढा होता.
केपीआयटी टेक्नोलॉजीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ७ टक्क्यांची घट झाली असून ती ४०.९ कोटी रुपयांच्या तुलनेत ३८.१ कोटी रुपये एवढी नोंदवली गेली. कंपनीचा महसूल १.१ टक्क्यांनी वाढून ५५० कोटी रुपयांच्या तुलनेत ५५६.२ कोटी रुपये एवढा झाला.
जागतिक बाजारपेठेवर लॉकडाउनचा परिणाम:
लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरू होईल, अशी सकारात्मक भावना बाजारकर्त्यांमध्ये असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सुधारण होईल, असे म्हटले जात आहे. ब्रेंट क्रूड फ्यूचर्स १.५ टक्क्यांनी म्हणजेच ३५.६२ डॉलर प्रति बॅरलने घसरल्याने तेलाच्या किंमतीत थोडी घसरण दिसून आली. अमेरिका आणि चीनदरम्यानच्या वाढत्या ताणामुळे जागतिक बाजारातील आकड्यांवर परिणाम झाला. सध्या सुरु असलेल्या निषेधादरम्यान हाँगकाँगच्या हँग सेंग व प्रमुख लँडशेअर असलेल्या यांच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांची घट झाली.