मुंबई, 4 जून : भारतीय शेअर बाजारातील बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील स्टॉक्सनी आज सलग सहाव्या दिवशी वृद्धी करणा-या व्यापारासाठी इंधन पुरवण्याचे काम कले. निफ्टी ८२.४५ अंक म्हणजेच ०.८३% वाढून १०,०६१.५५ अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्सदेखील २८४.०१ अंकांची किंवा ०.८४%ची बढत घेत ३४,१०९.५४ अंकांवर स्थिरावल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील ११ पैकी ९ सेक्टरल्सनी आज हिरव्या रंगाची स्थिती दर्शवली. यात निफ्टी पीएसयू बँक इंडेक्सनी नेतृत्व केले. यात आज ५ टक्क्यांची वृद्धी झाली. इतर निफ्टी निर्देशांकात निफ्टी बँक, रिअॅलिटी, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट बँकांचा समावेश असून यांनी जवळपास १-३ टक्क्यांनी वृद्धी घेतली.
प्रमुख लाभधारकांमध्ये कोटक महिंद्रा (३.११% ), आयसीआयसीआय बँक (२.६१%), एमअँडएम (५.४३%), बजाज फायनान्स (३.१५%) आणि नेस्ले (२.६८%) यांचा समावेश होता तर एनटीपीसी (१.९६%), विप्रो (१.७४%), भारती इन्फ्राटेल (१.९५%), झी एंटरटेनमेंट (१.९९%), आणि इंडसइंड बँक (१.५१%) हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट होते.
जागतिक बाजारपेठ: जागतिक बाजारानेही वृद्धीची दिशा कायम ठेवून तीन महिन्यातील उच्चांकाला स्पर्श केला. एमएससीआय वर्ल्ड इक्विटी इंडेक्स ४९ देशांतील शेअर्सचे प्रतिनिधीत्व करते. हा इंडेक्स ६ मार्च २०२० नंतर आज सर्वोच्च स्तरावर पोहोचला.
कमोडिटीजमध्ये तेलाच्या किंमती वाढल्या. मार्च २०२० पासून या किंमतींनी प्रथमच ४० डॉलर प्रति बॅरल एवढे मूल्य गाठले. कोव्हिड-१९ मुळे निर्माण झालेल्या संकटातून सुधारणेचे संकेत आणि अमेरिकी इन्व्हेंटरीच्या खालावलेल्या पातळीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या.