
कोल्हापूर : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच संतापले. संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, त्याचे सार्वजनिक जीवनात योगदान काय ? त्यांच्याकडे केवळ पद आहे म्हणून त्यांचे नाव आहे, असे म्हणत पवारांनी निरुपम यांच्यावर तीव्र टीका केली. राष्ट्रवादी आणि भाजप यांनी छूपी युती केली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला होता. यावर पवार यांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले.शरद पवार हे कोल्हापूर दौर्यावर आले असता, पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपा युतीवर भाष्य केले. महापालिकेत या दोन्ही पक्षांमध्ये युती न झाल्याने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. शिवसेना सत्तेत राहीली तर हा पक्ष केवळ सत्तेसाठी युती करतो, असा संदेश लोकांमध्ये जाईल. भाजपा सरकारला पाठिंबा देण्याचा विचार नाही. याबाबतचा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, असे पवार म्हणाले.
राष्ट्रपतीपदासाठी आमच्या पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. तेव्हा या पदाबाबत मी फार आशावादी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.