मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मुस्लीम म्हणून मारले नाही तर स्वराज्याचा शत्रू म्हणून संपवले, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. पवार यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, असेही पवार म्हणाले आहेत. महाराजांचा नौदल प्रमुखदेखील मुस्लीम होता, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते. त्यांनी अफजल खानाचा वकिल कृष्णाजी कुलकर्णीचाही वध केला होता, असे पवार म्हणाले आहेत.