रत्नागिरी, (आरकेजी) : शाळेत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांसह पालकांनी ठिय्या आंदोलन केले. गुहागर तालुक्यातल्या साखरी त्रिशूळ कोडबा प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता आहे. ४ शिक्षकांची आवश्यकता असतानाही शाळेत एकच शिक्षक उपलब्ध आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत शिक्षणाधिकार्यांनाही निवेदन देण्यात आले होते. पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर पालकांनी आज आंदोलनाचे हत्यार उपसलं. आज सकाळपासून जिल्हा परिषदेमध्ये मुलांसह पालकांनी आंदोलन केले.