मुंबई : शाळेचा पहिला दिवस म्हणजे आधी मुलांची रडारड भिती आणि पालक हैराण असं चित्र असायचं.आजपासून शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या.शाळेचा आज पहिला दिवस.भांडूप येथील राजाराम शेठ विद्यालयात शाळेत प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्यांना उत्साहवर्धक आणि आनंददायी वातावरण दिसावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केलेले होते . मराठी शाळेतल्या मुलांची पटसंख्या वाढावी, त्याना शिक्षणाची गोडी लागावी या हेतूने शिक्षक पहिल्या दिवशी शाळा पानाफुलांच्या तोरणांनी सुशोभित करून मुलांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षणाचे महत्व सर्वाना व्हावे, जनगागृती व्हावी यासाठी खिंडीपाडा, दर्गा रोड ,अमरनगर, आदिवासी पड्यामध्ये प्रभात फेरीचे आयोजन मुख्याध्यापिका सौ.रश्मी खानविलकर यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते.विविध घोषणा देऊन शिक्षणाचे महत्व विभागातील लोकांपर्यंत पोहोचवित होते. पाचवी ते आठवीत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.