मुंबई : सामाजिक क्रांतीचे थोर उद्गाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधान भवनातील छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
याप्रसंगी माजी विधानसभा सदस्य मधु चव्हाण तसेच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनीही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, अवर सचिव म. की. वाव्हळ, कक्ष अधिकारी रा.मो. गोसावी, अजित पालवे उपस्थित होते. त्यांनीही शाहु महाराज यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.