मुंबई : मुंबई विद्यापिठाने कला व वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांत शिकणार्या विद्यार्थ्यांचे निकाल रखडवले आहेत. तेव्हा बुधवारपर्यंत निकाल जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय)ने मुंबई विद्यापिठाला दिला आहे.
विद्यार्थ्यांचे निकाल त्वरीत जाहीर करावेत, यासाठी एसएफआय मुंबई जिल्हा समितीने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. चर्चेदरम्यान,
वसावे यांनी विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात नकारात्मक उत्तर दिले, असा आरोप संघटनेने केला आहे. टी.वाय.बी.ए चा निकाल केव्हा जाहीर होईल, याबाबत ते नेमके उत्तर देऊ शकले नाही. टी.वाय.बी.ए चा निकाल येणाऱ्या मंगळवार किवा बुधवार पर्यंत लागतील असे ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या या संथ कारभाराचा एसएफआयने तीव्र निषेध केला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे, असे संघटनेने म्हटले आहे.