
Mumbai : आयआयटी मुंबईतील शुल्कवाढीचा स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया ( SFI ) मुंबई कमिटी विरोध शुल्कवाढीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.
आयआयटी मुंबईने शैक्षणिक वर्षे २०२२-२०२३ मध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कमालीची वाढ केलेली आहे. PG आणि PHD च्या विद्यार्थ्यांचे शुल्क वाढवले आहे. विशेषतः जे ऑन रोल विद्यार्थी आहे, त्यांची फी ४५ टक्के इतकी वाढली तर नवीन प्रवेश घेणाऱ्या PG विद्यार्थ्यांची फी ९००% इतकी वाढली. यात मोठा वाटा हॉस्टेल आणि इतर सोयीसुविधा यांचा असून,वसतिगृहातील सुविधांसाठी अतिरिक्त १८०० शुल्क भरण्यास सांगितले आहे.वसतिगृहाचे भाडे ६०० रूपयांनी वाढविण्यात आले आहे.शुल्कवाढीमध्ये अनेक घटक असे आहेत की त्याच्या मागचा हेतू स्पष्ट नाहीये, असे एसएफआयने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांनी या शुल्क वाढीच्या विरोधात १००० सह्या असलेलं पत्र Dean (students affairs ) यांच्याकडे सोपवलं. ते पत्र पोहोचता क्षणी पासून विद्यार्थ्यांना शुल्क भरण्याचा तगादा लावण्यासाठी आठवण म्हणून दिवसातून ३ वेळा मेल यायला लागले. शिवाय विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठीचे मेल वारंवार पाठवा अशा सूचना देणारा मेल हॉस्टेलहॉल मॅनेजरला पाठवण्यात आला, अशी माहिती एसएफआयच्या वतीने देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सह्यांचे निवेदन दिले त्याच दिवशी Dean महोदयांनी “ही लोकशाही नाही” असा शब्द वापरला (It’s financial matter, not a democracy ). या विधानाचा SFI जाहीर निषेध करीत आहे, असे एसएफआयने म्हटले आहे.
निवडून दिलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना शुल्कवाढी संदर्भात अनभिज्ञ का ठेवले? Students fee commitee मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी सामावून घेण्याची सूचना असताना ते बाजूला का ठेवले गेले? शिवाय शुल्कवाढीच्या मिटिंगचे मिनिट्स ही पुरवण्यात आले नाही? असे प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. विद्यार्थी Consultancy, प्रोजेक्ट्स, Govt-Non Govt projects सगळीकडे काम करत असतात. सोबत आठवड्याला टिचिंग असिस्टंटशीपही करावी लागते. त्यातूनच आयआयटीला दरवर्षी ३०० कोटी रुपये उभे राहतात. पण रिसर्च वरती खर्च नाही तर गुंतवणूक होत असते हे अजूनही व्यवस्थेला वाटत नाही. अनेक वेळा प्रशासन फक्त balance sheet दाखवण्याचा प्रयत्न करतंय. आयआयटी बॉम्बे ही उत्पन्न आणि खर्च यांचा ताळेबंद मांडायला काही कॉर्पोरेट कंपनी नाही, असे एसएफआयने म्हटले आहे.















