मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिमेतील डीजी खेतान शाळेत रविवारी 3 फेब्रुवारी रोजी ‘हेतू’ चॅरिटेबल ट्रस्टकडून मालाड आणि मालवणीतील शंभर गरजू महिलांना शिलाई यंत्रांच वाटप करण्यात आलं. ‘हेतू’च्या वतीने गेल्या वर्ष भरात तीनशे महिलांना शिलाई यंत्र वाटप केले गेले आहे. 500 महिलांना येत्या वर्षभरात यंत्र वाटपाचे लक्ष्य आहे. या पूर्वी घरघंटी चा वाटप करण्यात आलं होतं.
दिव्यांग आणि दृष्टिहीन लोकांना दिवाळी साजरी करण्यासाठी 1200 हुन अधिक दिव्यांगांना भेटवस्तूच वाटप ‘हेतू’ करत आलं आहे. तसेच शंभर आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणा साठी प्रत्येकी दहा हजार रुपयेची मदत व शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक रिखब जैन यांनी दिली आहे. महिलांना स्वयं रोजगार उपलब्ध करण्यासाठी उपक्रम राबवला जात असल्याची माहिती रिखब जैन यांनी दिली.