नवी दिल्ली : तामिळनाडूमधल्या थेनी जिल्ह्यात पोट्टीपुरम इथं भारतीय अति लघूकण वेधशाळा(न्यूट्रिनो ऑब्जर्व्हेटरी) स्थापण्यासाठी सरकारनं मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचा उद्देश 51 हजार टन लोहासाठी उष्णता मापन आणि शोधक यंत्रणा बसवण्याचा आहे. तसेच त्याव्दारे या पर्वतराजींमध्ये खोदण्यात आलेल्या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या बोगद्यामध्ये वातावरणातल्या अति लघूकणांचे निरीक्षण, संशोधन करण्यासाठी या वेधशाळेची निर्मिती करण्यात येणार आहे. या वेधशाळेमुळे वातावरणातले ध्वनीप्रदूषण कमी करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी उपाय योजना करता येवू शकणार आहे.
नव्याने सुरू करण्यात येणारी ‘आयएनओ’ म्हणजेच भारतीय अतिलघूकण वेधशाळा या भागातल्या पर्यावरण साखळीला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवणार नाही. तसेच या वेधशाळेतून कोणत्याही प्रकारचे किरणोत्सर्जन होणार नाही. विकिरणाचे कोणतेही कार्य इथून केले जाणार नाही. तर फक्त वातावरणातल्या किरणांचे मोजमाप करण्यात येणार आहे.
सध्या भारतामध्ये कुठेही अशा प्रकारे अति लघूकण शोधक यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. अशा प्रकारची ही देशातली पहिली वेधशाळा असणार आहे.
या वेधशाळेच्या स्थापनेविषयी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार),ईशान्य विभाग विकास मंत्री, कार्मिक विभागाचे राज्यमंत्री, तसेच अणुऊर्जा आणि अवकाश खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.