
मुंबई (निसार अली) : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे १५ वे प्रदेश संमेलन यंदा १६ व १७ नोव्हेंबर रोजी महाबळेश्वर , जिल्हा सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलन अध्यक्षपदी वरिष्ठ पत्रकार , विचारवंत सुनील तांबे यांची निवड संघटनेने जाहीर केली आहे. या संमेलनाला राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास प्रदेश संमेलन समितीने व्यक्त केला आहे.














