मुंबई ः भारताचे मा.पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सुनील पोतदार यांची नियुक्ती 21 जानेवारी 2025 रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केली.
सुनील पोतदार हे जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाचे काम करीत असून, ते जनता दलाचे जिल्हाध्यक्ष, कोकण प्रदेश संघटक म्हणून काम पाहत होते. ते जनता दलाचे जिल्ह्याचे सचिव असताना त्यांनी भारताचे मा.पंतप्रधान कै.व्ही.पी.सिंग यांना रायगड जिल्ह्यातील पेण येथे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी पक्षाची जिल्ह्यातील राज्यस्तरिय अनेक पदे भूषविली आहेत. ते लढावू म्हणून ओळखले जातात. त्यांनी वडखळ येथील इस्पात (जेएसडब्ल्यू) या कंपनीसाठी जमिनी गेलेल्या शेतकर्यांना रोजगार आणि शेतकर्यांना शेतीचा भाव चांगल्या प्रकारे मिळवून दिला. त्यांनी झोपडपट्टी कामगार आदी क्षेत्रात उल्लेखनिय काम केले असून अशा निस्वार्थी आणि समाजसेवकाची महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केल्यामुळे पक्षाची राज्यभर पाळेमुळे जाण्यास पक्षाला नक्कीच मदत होईल, असे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
ते दै.रायगड नगरी या वृत्तपत्राचे मुख्य संपादक असून त्याचे संपादन गेले 20 वर्षे ते करीत आहेत. त्यामुळे त्याचा फायदा आणि पक्षाचा पदाचा फायदा सामान्य नागरिकांना होवून पक्ष वाढीसाठी नक्कीच मदत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.