
मालाड : राष्ट्र सेवा दल,मालवणी आणि सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीने सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 4 जून रोजी दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत,₹ राष्ट्र सेवा दल कचेरी, 2/3साने गुरुजी वसाहत,नीलम फोटो स्टुडिओ जवळ मालवणी,मालाड(प), येथे कार्यशाळा होईल. एक हजार सीड बॉल तयार करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, आरे कॉलनी गोरेगाव, मालाड मनोरी सह इतर भागात रोपण करण्यात येणार आहे.तसेच मालाड,मालवणी,चारकोप कांदिवली, गोरेगाव येथील काही शाळांना या सीड बॉल चा वाटप करून शाळेचे शिक्षक , विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी सहभागी करून घेण्याचे उद्देश आहे.आयोजकांनी आवाहन केले आहे की, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी 9987149549/9967518107 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
निसार अली ,वैशाली महाडिक,मेरी चेट्टी,नमिता मिश्रा,कृष्णा वाघमारे, मनोज परमार, निकोलस पटेल यांनी कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच ज्यांच्याकडे आंबे,फणस, काजू,जांभूळ व इतर कोणते ही प्रकारचे बियाणे असतील त्यांनी आयोजकांना देण्याची विनंती केली आहे.















