रत्नागिरी : थोर समाजसेविका आणि महिला शिक्षण कार्यातील अग्रणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार विजय दांडेकर व वैशाली पाटील उपस्थित होते.