~ ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची केली व्यवस्था ~
मुंबई : देशभरातील कोव्हिड-१९ रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने आरोग्यसेवा प्रणालीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या मागणीत एकाएकी झालेली प्रचंड वाढ आणि ग्रामीण आरोग्यसेवा प्रणालीच्या मागणीवरील संभाव्य ताण लक्षात घेता सेव्ह द चिल्ड्रन या लहान मुलांच्या शिक्षण, आरोग्य संरक्षण यासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थेने ‘प्रोटेक्टअमिलियन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत संस्थेने ७०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी केले असून ११ राज्यातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये ते वितरीत केले जात आहेत.
संस्थद्वारे नुकतेच राजस्थानमधील टोंक येथील विशेष नवजात केअर युनिटमध्ये नवजात बाळाला वाचवण्यासाठी ५ लीटर कॉन्सन्ट्रेटर पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली. २०२० मध्ये महामारीच्या सुरुवातीपासूनच सेव्ह द चिल्ड्रन, इंडियाने वंचित आणि अपंग मुलांना आणि त्यांच्या कुटुंबाला क्रिटिकल केअर आणि सेवा पुरवल्या. यामुळे ५.५७ लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावर प्रभाव पडला आहे.
यावर्षी दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच या संस्थेने १२ राज्यांमधील ५७ जिल्हे आणि २ केंद्र शासित प्रदेशात विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. भारतातील दुर्गम भागात, जेथे आरोग्य सेवा नाजूक आणि कमकुवत आहे, अशा ठिकाणी पोहोचण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्था ऑक्सिजन पुरवठा, वैद्यकीय मदत, कोव्हिड केअर किट्स, हायजिन किट्स घरी पोहोचवते तसेच टेली कन्सल्टेशनचीही मदत पुरवते.
फक्त वैद्यकीय आपत्कालीन सुविधा पुरवून, हे काम थांबत नाही. महामारीने लाखोंच्या उपजीविकेवर तसेच देशातील मुलांवर परिणाम केला आहे. अचानक माणसे गमावणे, दु:ख, स्थलांतर आणि शिक्षणातील अडथळ्यांमुळे देशभरातील मुले त्रस्त आहेत. वाढत्या बालसंरक्षण प्रकरणांवर उपाय म्हणून कोणत्याही संकटाचा सामान्य परिणाम म्हणून, ही संस्था काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या सर्व मुलांना संबंधित सरकारी अधिकारी आणि चाइल्डलाइन १०९८, राष्ट्रीय/राज्य संरक्षण आयोग यासारख्या वैधानिक रचनांशी जोडत आहे. यासह, काही राज्यांमध्ये मुलांसाठी ट्रॉमा हेल्पलाइन्स चालवली जाते, यात दररोज सुमारे ८० कॉल्स रेकॉर्ड होतात.