
मुंबई, 11 फेब्रुवारी 2026: भारतातील जुने आणि प्रतिष्ठित रिअल इस्टेट डेव्हलपर असलेल्या ‘सत्त्वा’ ग्रुपने आज 80 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त बांधकाम क्षेत्राच्या सहा निवासी आणि व्यावसायिक पुनर्विकास प्रकल्पांसह मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) प्रवेश करत असल्याची औपचारिक घोषणा केली. स्पर्धात्मक मूल्यांकनाद्वारे मिळालेले हे प्रकल्प *परळ (शिवडी), प्रभादेवी, गोरेगाव पूर्व, विलेपार्ले पश्चिम, पवई आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी)* परिसरात आहेत.
*या सहा प्रकल्पांच्या माध्यमातून 2500 पेक्षा जास्त पुनर्वसित घरे आणि 2000 पेक्षा जास्त नवीन बांधलेली निवासी घरे देण्याची ‘सत्त्वा’ ग्रुपला आशा आहे. या सर्व प्रकल्पांचे बांधकाम 2026 मध्ये सुरू होईल आणि 2032 पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू राहील. यांपैकी पहिला प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पांचे एकूण सकल विकास मूल्य (जीडीव्ही) अंदाजे 11,000 कोटी रुपये आहे.*
मुंबई ही एका संरचनात्मक नूतनीकरणाच्या व्यापक टप्प्यातून जात आहे. अशा वेळेस कंपनीचा हा प्रवेश झाला आहे. आधुनिक सुरक्षा, नियोजन आणि शाश्वततेच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी शहरातील16,000 पेक्षा जास्त जुन्या इमारतींना पुनर्विकासाची गरज आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमन (डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन – डीसीपीआर) 2034 मधील आगामी सुधारणांमुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि सोसायटीकेंद्रित प्रारूप अशा सर्व क्षेत्रांत पुनर्विकासाची शक्यता वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिक शिस्त असलेल्या विकासकांसाठी मोठी मागणी निर्माण होणार आहे.
‘सत्त्वा’च्या मुंबई पोर्टफोलिओला अनेक मापदंड असलेल्या काटेकोर चौकटीतून आकार मिळाला आहे. यामध्ये नियामक स्पष्टता, अभियांत्रिकी व्यवहार्यता, पर्यावरणीय जबाबदारी, जीवनचक्र मालमत्ता कार्यप्रदर्शन आणि भागधारकांचा सहभाग यांचा समावेश आहे. या ग्रुपने गेल्या वर्षभरात प्रमुख पुनर्विकास मायक्रो-मार्केटमध्ये सखोल स्थानिक माहिती संकलित केली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अचूक टप्पे करणे, डिझाईनची कार्यक्षमता आणि स्थानिक नियामक गरजांना अनुकूल कार्यान्वयनाचे धोरण आखणे शक्य झाले आहे.
या नवीन घडामोडीविषयी बोलताना *’सत्त्वा’ ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विजय अग्रवाल म्हणाले,* “मुंबई ही शहरी नूतनीकरणाच्या एका निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. जुन्या इमारतींच्या जागी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भविष्यासाठी सज्ज असलेल्या घरांची असलेली गरज त्याला चालना देत आहे. पुनर्विकासाला स्पष्टता, शिस्त आणि दीर्घकालीन कटिबद्धतेची आवश्यकता असते. ‘सत्त्वा’ ग्रुपच्या गेल्या तीन दशकांतील वाढीच्या केंद्रस्थानी हीच मूल्ये राहिली आहेत. मुंबईतील आमचा प्रवेश हा मोठे, तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे प्रकल्प वेळेवर आणि सातत्याने पूर्ण करण्याच्या आमच्या परंपरेचाच धोरणात्मक विस्तार आहे. या शहराच्या पुढील दशकातील विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
‘सत्त्वा’ ग्रुपच्या पुनर्विकासाच्या नीतीनुसार, मुंबईतील प्रकल्पांमध्ये सुरक्षा, पारदर्शकता आणि दीर्घकालीन शाश्वततेवर केंद्रित असलेल्या, पुनर्वसन-आधारित, सुनियोजित दृष्टिकोनाचा अवलंब करण्यात आला आहे. सध्याच्या रहिवाशांना अद्ययावत सुविधा, वाढीव सुरक्षा प्रणाली आणि संक्रमणाचा सुनियोजित आधार मिळेल. पुनर्विकास प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत समर्पितपणे समन्वय करणाऱ्या टीम्स त्यावर देखरेख करतील.
अभियांत्रिकीवर केंद्रित असलेली रचना आणि सुशासनावर आधारित प्रकल्प व्यवस्थापन हा ‘सत्त्वा’ ग्रुपचा पाया आहे. या समूहाच्या मुंबईतील प्रवेशातून गुंतागुंतीच्या शहरी पुनर्विकासामध्ये एका शिस्तबद्ध दृष्टिकोनाचे प्रतिबिंब पडले आहे. तसेच त्यामध्ये कार्यान्वयनाची निश्चिती आणि मालमत्तेची दीर्घकालीन अखंडता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जुन्या होँणाऱ्या घरांच्या नूतनीकरणास आणि सुरक्षित, अधिक लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज अशा शहरात मुंबईचे रूपांतर होण्यास त्यामुळे मदत होईल.















