मुंबई : टाळ-मृदुगांच्या गजरात कांजूरमार्ग येथील नेव्हल डॉकयार्डमधील ओमकारेश्वर मंदिरात सत्संग उत्साहात पार पडला. 26 जानेवारीला झालेल्या सत्संगात भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले.
वै. ह.भ.प. बाबुराव महाराज सरवदे यांच्या प्रेरणेने सत्संग घेण्यात आला. भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. ओमकारेश्वर देवायल ट्रस्ट, नेव्हल डॉकयार्ड कांजूरमार्गने यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. नेव्हल डॉकयार्ड भजनी मंडळ यांच्यासह भांडुप भागातील वारकरी सेवा भजनी मंडळ, श्रीकृष्ण सेवा मंडळ, आदिनाथ सांप्रयिक मंडळ, विठ्ठल रखुमाई भाविक मंडळ, ज्ञानेश्वरी पारायण भजनी मंडळ आदी मंडळांनी यावेळी उपस्थिती दर्शविली.
कार्यवाहक मोहिते, परशुराम काळे, अजय सावंत, प्रभू, प्रवीण सकपाळ, रामदास शिंदे, लक्ष्मण बामणे, राजाराम पडवळ, गणेश शिंदे, विनय सावंत, मिलिंद सावंत, निलेश शिंदे, ऍड. दत्ता काळे, वैभव जमदाडे आदींचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले. राणे कॅटरर्सने विशेष सहकार्य केले.