रत्नागिरी (आरकेजी) : सर्पाच्या दंशानेच सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लांजा तालुक्यात घडली. सुजित उर्फ अबू कांबळे असं मृत्यू झालेल्या सर्पमित्राचं नाव आहे.
लांजा येथील निसर्ग संवर्धन संस्था सर्प पकडून त्यांना जिवदान देण्याचे काम करते. सुजित या संस्थेचा कार्यकर्ता होता. कोणाच्या घरी किंवा परिसरातमध्ये सर्प आला तर अनेकजण सुजीतला बोलवत असत. लांजा तालुक्यातील कुवे इथेहि शनिवारी सुजित सर्प पकडण्यासाठी गेला होता. मात्र सर्प पकडत असताना या सर्पानेच त्याला दंश केला. त्यानंतर त्याला प्रथम लांजा येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती अधिकच या सर्पदंशाने अधिकच खालावत चालली होती. त्यामुळे त्याला रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर उपचार सुरु असताना सुजीतची प्राणज्योत मालवली. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.