रत्नागिरी : येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरातील सेविका सरिता साळुंखे तथा मावशी यांचा सेवानिवृत्तीबद्दल शाळा व भारत शिक्षण मंडळातर्फे हृद्य सत्कार करण्यात आला. 21 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. या वेळी मंडळाच्या नमिता कीर, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, माजी शिक्षिका जयश्री गणपुले, रेडीज, भारती खेडेकर, बियाणी बालमंदिरच्या मुख्याध्यापिका शेट्ये, गुण्ये, सागवेकर, सुधीर शिंदे आदींनी मनोगतामध्ये साळुंखे मावशींचे प्रेमळ, वात्सल्य व मुलांना आपलेसे करून घेण्याबद्दलचे गुण सांगितले. कार्यक्रमाला दिलीप साळुंखे व त्यांचा मुलगा, मुलगी, कुटुंबीय उपस्थित होते. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनीही मावशीला भेटवस्तू देऊन सत्कार केला. मावशींच्या या प्रेमळ स्वभावामुळे आगाशे विद्यामंदिरसह पटवर्धन हायस्कूल, संस्थेतही चांगली कामगिरी केली.