रत्नागिरी, (आरकेजी) : शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढला तर राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत सरकारला पाठींबा देणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चिपळूण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हिवाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धऱण्याची रणनिती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली असून कोणत्याही परिस्थितीत हे अधिवेशन होवू देणार नसल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सरकारने जी कर्जमाफी दिली ती फसवी कर्जमाफी असल्याचा आरोप तटकरे यांनी केला असून हाच मुद्दा घेवून सरकारवर हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यासाठी अधिवेशनापूर्वी पदयात्रा काढली जाणार आहे, असेही ते म्हणाले. राज्यात कायदा सुववस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. अनिकेत कोथळेचा पोलिसांनी केलेला खून असेल किंवा नगरमध्ये शेतक-यांवर केलेला गोळीबार असेल या सगळ्यामुळे कायद्याचा वचकच राज्यात राहिलेला नाही, असा आरोपही त्यांनी केला.