रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- रत्नागिरीमधील नाचणे येथे डांबर असलेल्या ड्रममध्ये अडकलेल्या नागाला जीवनदान देण्यात सर्परक्षकाला यश आलं आहे.
नाचणे येथील पटवर्धन डॉक्टरांच्या समोरील प्लॉटमध्ये कन्स्ट्रक्शनचं काम सुरु होते. तिथे असलेल्या ड्रममध्ये डांबर होतं. त्या ड्रममध्ये काल दुपारच्या सुमारास कोब्रा जातीचा साप गेला. मात्र त्या ड्रममध्ये डांबर असल्यामुळे त्या डांबरमध्ये हा साप पूर्णपणे अडकून पडला. त्याला बाहेरच पडता येईना. तिथे असलेल्या नागरीकांच्या हि गोष्ट लक्षात आली. त्यांनी लगेच याची माहिती सर्पमित्र प्रवीण कदम यांना दिली. प्रवीण कदम लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अथक प्रयत्नानंतर डांबरमध्ये फसलेल्या सापाला त्यांनी बाहेर काढलं. त्यानंतर या सापाला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं.