मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे,
अंतर्गत मुंबई सहकारी बोर्ड लि. मुंबई व श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 20 नोव्हेंबर रोजी सहकारी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सांताक्रूझ पूर्व येथे सायंकाळी 5 वाजता सीतासिंधू हॉल, विहार हॉटेल समोर, व्हीनस स्टुडिओ मागे येथे होईल.
राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली यांच्या धोरणानुसार, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे अंतर्गत मुंबई सहकारी बोर्ड लि., मुंबई व श्री कुलस्वामी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ते २० नोव्हेंबर २०२२ या दरम्यान मुंबईमध्ये ६९ वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवार दि. २० नोव्हेबर २०२२ रोजी सायं. ५.०० वा. “आर्थिक समावेशन, प्राथमिक शेती सहकारी संस्थाचे संगनिकी करण व सहकाराचे डेटाबेसचे बळकटी करण” या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार श्री. प्रविणभाऊ दरेकर (अध्यक्ष- मुंबई जिल्हा मध्य. सहकारी बँक लि.) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव नलावडे (अध्यक्ष – बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित), प्रमुख पाहुणे मा. श्री. सिद्धार्थ कांबळे (उपाध्यक्ष- मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक लि.), मा. श्री. नंदकुमार काटकर( संचालक – मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक लि.) मा. श्री. पुरुषोत्तम दळवी (संचालक – मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक लि.), मा. श्री. आनंदराव गोळे ( संचालक – मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक लि.), मा. श्री. विनोद बोरसे(संचालक – मुंबई जिल्हा मध्य सहकारी बँक लि.) मा. श्री. राजेंद्र वीर, (जिल्हा उपनिबंधक – सहकारी संस्था मुंबई – ३), . श्री. कैलास जेबले जिल्हा उपनिबंधक – सहकारी संस्था), श्री. विजय पाटील, (सहाय्यक निबंधक – सहकारी संस्था), मा. श्री. बजरंग जाधव,)( उपनिबंधक – सहकारी संस्था एच पश्चिम विभाग ), मा. श्री. यशवंत (भाई) सावंत,( संचालक – मुंबई डिस्ट्रीक्ट हौ. फेडरेशन मर्यादित ), मा. श्री. पंकज सकपाळ (अध्यक्ष- विश्वशांती उत्कर्ष संस्था) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.